बारक्या पोरांनी काय घोडं मारलंय? आमच्यासाठी लाडकं लेकरू योजना..; भोऱ्याचं भाषण तुफान व्हायरल
सरकारने बारीक-सारीक लाडकं लेकरू योजना आणावी, आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा, अशी मादणी करत शहाणे व्हा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही.. हेच भोऱ्याचं भाषण सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.
राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा असताना लाडकं लेकरू योजना सुरू करा अशी मागणी एका लहान पोराने केली आहे. मोठाल्या पोरांना सरकारने पगार सुरू केला. आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलंय. आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात, असं म्हणत कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या याने सरकारकडे सरसकट मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केली आहे. अंबज तालुक्यातील रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत ३रीत शिकणाऱ्या या भोऱ्याने दमदार भाषण केल्याने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज स्वातंत्र्यदिनी खरच बारक्या पोरांना खरंच स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न त्याने विचारला आहे. सुट्टी असली की, घरचं काम, रानातलं काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही, आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तमाल करायला लागले मोठाले, असे म्हणत त्याने एकच भाषणात हल्लाबोल केलाय. बघा एकदा व्हायरल होणारं भाषण…