Karuna Sharma : ‘मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार…’, करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र कोर्टात सादर, नेमका काय उल्लेख?
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये पोटगी दर महिन्याला पोटगी द्यावी, असा आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला आव्हान देण्यासाठी माझगाव सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे माझगाव सत्र न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांच लक्ष लागलेल आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने पोटगी संदर्भात जो निर्णय दिला होता त्यावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. यासंदर्भात थोडयाच वेळात निर्णय येण अपेक्षित आहे. मात्र करुणा शर्मा यांना कोर्टान जे काही कागदपत्र सादर करण्याची सूचना दिलेल्या होत्या त्यामध्ये धनंजय मुंडे यांच अंतिम इच्छापत्रही त्यांनी बनवलेलं होतं. करुणा शर्मा यांच्याकडून कोर्टात धनंजय मुंडेंच अंतिम इच्छापत्र सादर करण्यात आले आहे. अंतिम इच्छापत्रात करुणा शर्मा यांचा पहिली पत्नी असा उल्लेख आहे. यासह धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात चार मुलांची नावे आहेत. सादर केलेलं इच्छापत्र खरं असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटल आहे. तर करुणा शर्मा यांनी सादर केलेलं इच्छापत्र खोटं असल्याचं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटले आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलगा सिशीव माझे अंत्यसंस्कार करणार. करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात हा उल्लेख आहे. २०१७ च्या आसपास हे अंतिम इच्छापत्र बनवलं असल्याची नोंद आहे. त्यामध्ये करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी असा उल्लेख केलेला आहे तर राजश्री मुंडे या दुसऱ्या पत्नी आहेत हा देखील उल्लेख केलेला आहे आणि दोन्ही पत्नींपासून किती त्यांना अपत्य आहे त्यांची नावं काय आहेत हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. बघा त्यात नेमकं काय-काय म्हटलंय?

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?

अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू

गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर

तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
