Karuna Sharma Video : ‘अजितदादा… जरा जमिनीवर या’, करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
सोमवारी विधिमंडळात सभागृहात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली. बीड जिल्ह्यात सुसज्ज असं विमानतळ उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. यावरून करूणा शर्मा यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ती घोषणा म्हणजे बीडमध्ये भव्य विमानतळ उभारणार आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांना रेल्वेसह आता विमानतळ देखील मिळणार आहे. सोमवारी विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज असं विमानतळ उभारण्याची घोषणा अजित पवारांनी केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या काही दशकांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेसह विमानतळाचेही स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. मात्र अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवरून करूणा शर्मा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजितदादा, हवेतली स्वप्न दाखवू नका जमिनीवर या…’, असं म्हणत करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर बीडमधल्या लोकांना धड एसटी बस नाही, असे म्हणत करूणा शर्मा यांनी अजित पवार यांना बीडमधील परिस्थिती सांगितली आहे. ‘जरा जमिनीवर या… आज तुम्ही बीड विमानतळ आणण्याची गोष्ट करताय. आज बीड मधील लोकांना बस नाही. दहा तास वाट पाहताय. ट्रेन नाही. एसटी स्टॅँडवर बाथरूम सुद्धा नाही’, असं करूणा शर्मा यांनी म्हटलं.

गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे

नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?

'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
