नाशिक-मुंबई महामार्ग अन् कसारा घाट धुक्यात हरवलं, बघा निसर्गाचं अद्भुत सौंदर्य
नाशिक मुंबई महामार्गावर धुक्याची चादर पसरली असून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाची अद्भूत किमया अनुभवण्यास मिळाली. नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या उंट दरी परिसरात सर्वत्र धुकं पसरलं असल्याने पर्यटक आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण परिसर आनंददायी
राज्यभरातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस चांगलाच झोडपून काढत असताना नाशिक मुंबई महामार्गावर अल्हाददायक वातावरण आणि निसर्गाचं अनोखं सौंदर्य आज पाहायला मिळालं. नाशिक मुंबई महामार्गावर धुक्याची चादर पसरली असून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाची अद्भूत किमया अनुभवण्यास मिळाली. नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या उंट दरी परिसरात सर्वत्र धुकं पसरलं असल्याने पर्यटक आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण परिसर आनंददायी झाला आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊलं आता नाशिकच्या इगतपुरी, कसारा या भागात वळू लागली आहे. तर नाशिक मुंबई महामार्गावर संपूर्ण धुकं पसरल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या नाशिक मुंबई महामार्गावर धुक्याचे साम्राज्य असून वाहन चालकांना आपली वाहने संथ गतीने धूक्यातून वाट काढत जावे लागत आहे. बघा धुक्यात हरवलेलं नाशिक मुंबई महामार्ग…