Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, अंबरनाथ ते सीएसएमटी रेल्वे सुरु

Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, अंबरनाथ ते सीएसएमटी रेल्वे सुरु

| Updated on: Jul 22, 2021 | 9:52 AM

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला.

नाशिक : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर जव्हार फाट्याजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना समोर आली. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारी रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबलच लांब रांगा दिसत होत्या. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वैतागले.