'चंद्रकांत पाटील पुण्यात आलेले पाहुणे? त्यांना किती दिवस ठेवायचं...', कुणाची खोचक टीका

‘चंद्रकांत पाटील पुण्यात आलेले पाहुणे? त्यांना किती दिवस ठेवायचं…’, कुणाची खोचक टीका

| Updated on: Apr 13, 2023 | 5:01 PM

VIDEO | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा रूबाब पुणेकरच उतरवतील, महाविकास आघाडीच्या नेत्यानं केला जोरदार हल्लाबोल

पुणे : पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत हू इज धंगेकर असा प्रश्न विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमदार धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची चंद्रकांत पाटील यांच्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात आलेला पाहुणा? त्यांना पुण्यात किती दिवस ठेवायचं हे पुणेकर पाहतील, असा म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. येत्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील की थांबतील हे लवकर कळेल. त्यांच्या बोलण्याचा रुबाब हा पुणेकर उतरवतील, असेही त्यांनी म्हटलंय.

Published on: Apr 13, 2023 04:53 PM