कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?

| Updated on: May 01, 2024 | 12:24 PM

कोकणातील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरूवात झाली आहे. कशेडी बोगद्यातून सुरू झालेल्या दुतर्फा वाहतुकीमुळे तब्बल ४५ मिनिटं वेळ लागणारा प्रवास आता फक्त ८ मिनिटांवर आला आहे. म्हणजेच केवळ आठ मिनिटांत कशेडी बोगदा आता कोकणातील प्रवाशांना पार करता येणार

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही देखील कशेडी बोगद्यातून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कोकणातील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरूवात झाली आहे. कशेडी बोगद्यातून सुरू झालेल्या दुतर्फा वाहतुकीमुळे तब्बल ४५ मिनिटं वेळ लागणारा प्रवास आता फक्त ८ मिनिटांवर आला आहे. म्हणजेच केवळ आठ मिनिटांत कशेडी बोगदा आता कोकणातील प्रवाशांना पार करता येणार आहे. कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरूवात झाल्याने कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दरम्यान, शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून बोगद्यातील प्रलंबित कामांना गती देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरूवात करण्यात आली आहे.

Published on: May 01, 2024 12:24 PM