काश्मिरी चिमुरडीची थेट मोदींकडे तक्रार, 48 तासात कार्यवाहीचे नायब राज्यपालांचे आदेश
“मोदी साब… लहान मुलांवर कामाचा इतका बोजा कशासाठी?” असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या सहा वर्षांच्या काश्मिरी चिमुरडीची हाक (Jammu Kashmir Girl) अवघ्या काही तासात शासनाने ऐकली.
श्रीनगर : “मोदी साब… लहान मुलांवर कामाचा इतका बोजा कशासाठी?” असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या सहा वर्षांच्या काश्मिरी चिमुरडीची हाक (Jammu Kashmir Girl) अवघ्या काही तासात शासनाने ऐकली. जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी शालेय शिक्षण विभागाला या प्रश्नी लक्ष घालण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. ट्विटरवर पोस्ट झालेली ही व्हिडीओ क्लिप 57 हजारांहून अधिक नेटिझन्सनी पाहिली असून, 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे होमवर्कची तक्रार करत ही चिमुरडी चर्चेचा विषय ठरली होती.
Published on: Jun 01, 2021 03:51 PM
Latest Videos