गोंदिया येथे हजारो महिलांना दाखवला 'द केरळ स्टोरी', सिनेमा बघितल्यावर म्हणाल्या...

गोंदिया येथे हजारो महिलांना दाखवला ‘द केरळ स्टोरी’, सिनेमा बघितल्यावर म्हणाल्या…

| Updated on: May 14, 2023 | 11:32 AM

VIDEO | गोंदियामध्ये हजारो महिलांना कुणी दाखवला मोफत दाखवला 'द केरळ स्टोरी' चित्रपट?

गोदिंया : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटात अदा शर्मा हिने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटावरून राजकारण सुद्धा पाहायला मिळत आहे. अशातच अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध सुद्धा दर्शविण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटाला पंसती देखील पाहायला मिळाली आहे. दरम्यान, गोंदिया येथे शिंदी समाजाद्वारे द केरळ स्टोरी हा चित्रपट हजारो महिलांना मोफत दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट बघण्यासाठी महिलांनी मोठया संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये युवा मुलींनी मोठ्या संख्येनं सिनेमा बघण्यासाठी आपली पसंती दाखवली तर हा सिनेमा बघितल्यावर आपल्या संस्कृतीला जपणे आजच्या घडीला गरजेचे असल्याचे मत सिनेमा बघितल्यावर महिलांना व्यक्त केले. तर युवा वर्गाने अगोदर आपल्या करियरकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे या सिनेमातून शिकण्यासारखे असल्याचे महिलांनी सांगितले आहे.

Published on: May 14, 2023 11:32 AM