अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

| Updated on: May 15, 2022 | 2:57 PM

केतकी चितळे हीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर केतकीला 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का ? मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? असा युक्तीवाद आज ठाणे कोर्टात केतकी चितळे हीने स्वत:केला. शरद पवारांच्याबाबतीत (Sharad Pawar) सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे (Ncp) कार्यकर्त्यांनी केतकी चितळेवरती (Ketki Chitale) जोरदार टीका केली आहे. केतकी चितळे हीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर केतकीला 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published on: May 15, 2022 02:57 PM