केतकी चितळे प्रकरणाचा तपास CBIकडे द्यावा, केतकीच्या वकिलांनी घेतली राज्यपालांची भेट

केतकी चितळे प्रकरणाचा तपास CBIकडे द्यावा, केतकीच्या वकिलांनी घेतली राज्यपालांची भेट

| Updated on: Jun 05, 2022 | 3:21 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे ही गेल्या दोन आठवड्यांपासून जेलमध्ये आहे. एकाच गुन्ह्याखाली तिच्यावर राज्यात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे ही गेल्या दोन आठवड्यांपासून जेलमध्ये आहेएकाच गुन्ह्याखाली तिच्यावर राज्यात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेतफेसबुकच्या फॉरवर्ड पोस्ट प्रकरणात अद्याप तिला जामीन मिळालेला नाही. या सगळ्या तक्रारी घेऊन केतकी चितळेचे वकील थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचलेया प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली आहेतसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केली आहे. केतकी चितळे हिला एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीसारखी वागणूक देत असल्याचे केतकीच्या वकिलांचे म्हणणे आहे

Published on: Jun 05, 2022 03:21 PM