“डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान, हा प्रत्येक श्री सदस्याच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण”
Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
खारघर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठीलाखो श्री सदस्य नवी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधीकारी यांना लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येक श्री सदस्यांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. 2008 ला याच मैदानात नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता पुन्हा याच मैदानात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. 20 लाख पेक्षा अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.