Satish Bhosle : खोक्या भोसलेला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्… फोटो व्हायरल
बीडमध्ये खोक्या भोसलेला वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, त्याच्या अंगावर वळ उठल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात वनविभागाच्या कोठडीत खोक्या उर्फ सतीश भोसले याला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वनविभागाच्या कोठडीत खोक्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तर खोक्या भोसले याच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. वकिलांनी केलेल्या या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यादरम्यान, खोक्या भोसलेच्या घराच वन्य जीवाचं मांस आढळून आलं होतं. त्यामुळे त्याच्यावर वन्य जीवाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणानंतर वनविभागाच्या पथकाकडून खोक्या भोसलेची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेला टॉर्चर केल्याची माहिती समोर आली आहे. हीच माहिती आरोपीने न्यायायलासमोर मांडली आहे. यानंतर कोर्टाकडून गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..

ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्

रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी

चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
