Kiran Gosavi | किरण गोसावी लवकरच पुणे पोलिसांसमोर शरण येणार – सूत्र

| Updated on: Oct 25, 2021 | 7:38 PM

किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं लोकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाल्या आहेत.

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात  (Mumbai Cruise Drugs Party) एनसीबीने (NCB) ताब्यात घेतलं, त्यावेळी किरण गोसावी (Kiran Gosavi) हा पंच होता. सुरुवातीला किरण गोसावीचे आर्यनसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो एनसीबी अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र गोसावीशी आपला संबंध नसल्याचं एनसीबीने स्पष्ट केलं. किरण गोसावी याने परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचं आता समोर आलं आहे.  किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं लोकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाल्या आहेत.