तर किरण सामंतच उमेदवार, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर उदय सामंतांचं मोठं वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेने रस्सीखेच कायम असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदे गटाने आपला दावा कायम असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तर नारायण राणे यांच्याप्रमाणे किरण सामंतांचा देखील रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरील लोकसभा निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात आहे. अर्ज भरणे ते मागे घेणे अशी प्रक्रिया सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेने रस्सीखेच कायम असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदे गटाने आपला दावा कायम असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तर भाजपचे मंत्री नारायण राणे यांच्याप्रमाणे किरण सामंत देखील रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा करत असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला जागा सोडली तर शिंदे गटाकडून किरण सामंतच उमेदवार असतील, असं मोठं वक्तव्य किरण सामंत यांचे मोठे बंधू आणि मंत्री उदय सामंत यांनी केलं. तर पक्षाने जबाबादारी दिली तर निवडणून येईन, असंही किरण सामंत यांनी म्हटलं होतं. तर महायुतीचा उमेदवार असून तोच निवडणून येईल, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.