Kirit Somaiya : सोमय्या यांच्या रडावर पुन्हा एकदा ठाकरे गट; केला मोठा आरोप

Kirit Somaiya : सोमय्या यांच्या रडावर पुन्हा एकदा ठाकरे गट; केला मोठा आरोप

| Updated on: Aug 08, 2023 | 11:41 AM

तर सोमय्या यांनी ठाकरे गटावर यावेळी गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांनी कोविड काळात ५ हजार कोटींची कामं केोली मात्र यातच ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे गटावर केला आहे.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी आपला मोर्चा ठाकरे गटाकडे वळवला आहे. तर सोमय्या यांनी ठाकरे गटावर यावेळी गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांनी कोविड काळात ५ हजार कोटींची कामं केोली मात्र यातच ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे गटावर केला आहे. तर रु. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटलमध्ये घोटाळा केल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे. त्यांनी, 1850 खाटांचे तात्पुरते कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च रु 10.94 कोटी. मुंबई महानगरपालिकेने दर महिने रु. 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले. ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट केल्याचा आरोप त्यांनी करताना त्याची चौकशीची होणार असल्याचा इशारा दिला आहे. तर याचदरम्यान त्यांनी मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळाही झाल्याचा आरोप केलाय.

Published on: Aug 08, 2023 11:41 AM