Kirit Somaiya | अनिल परब यांची हक्कालपट्टी होणारच – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोन अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा दावा भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केलाय. मुरुड मधील साई रिसॉर्ट एन एक्स हे अनधिकृत आहे, त्याशिवाय अनिल परब यांचे आणखी एक अनधिकृत रिसॉर्ट आहे. हे लपवलेल्या रिसॉर्टचे नाव सी कॉन्च रिसॉर्ट असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत.
Published on: Sep 03, 2021 08:10 PM
Latest Videos