Thackeray सरकारच्या इतर डर्टी डजनवर पण हातोडा पडणार
आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली 100 ते 150 गाड्यांची रांग लागली होती. यावेळी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
आज सकाळीच किरीट सोमय्या यांच्या घराखाली 100 ते 150 गाड्यांची रांग लागली होती. यावेळी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.
माध्यमांना मनाई
सोमय्या आज संध्याकाळी साई रिसॉर्टवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक त्यांना दापोलीतच अडवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अॅलर्ट झाले आहेत. शिवाय साई रिसॉर्ट परिसरात मीडियाला चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.