राज्यपालांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी - Kirit Somaiya

राज्यपालांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी – Kirit Somaiya

| Updated on: Feb 23, 2022 | 3:01 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे दोघेही माफियांना मदत करतात. ईडीनी चौकशी सुरू केलेले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे एकेक प्रकरण आता बाहेर येईल. त्यामुळे मलिक मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे दोघेही माफियांना मदत करतात. ईडीनी चौकशी सुरू केलेले कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे एकेक प्रकरण आता बाहेर येईल. त्यामुळे मलिक मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत. आता यावर काल उद्धव-राऊत जी ट्यून वाजवत होते, ते आज शरद पवार वाजवतायत. मात्र, त्यांच्यासह स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्या 19 बंगल्यांबाबत काहीच का बोलत नाहीत, असा सवाल बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. त्यांनी कार्लाई गावातील या बंगल्याच्या प्रकरणाची माहिती आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी भेटून दिल्याचे सांगितले. राज्यपालांच्या भेटीनंतर सोमय्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे माफियांना पाठिशी घालतात आणि मदत करतात. उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्याचे गौडबंगाल मी आज राज्यपालांना सांगितले आहे. या बंगल्यांचं उद्धव ठाकरेंनी खोटं रेकॉर्ड तयार का केलं, त्याचंक कारण काय. याचा तपास व्हावा, अशी मागणीही यावेळी सोमय्यांनी केली.

Published on: Feb 23, 2022 01:49 PM