Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, सोमय्या नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यापूर्वी शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सोमय्यांनी मागच्या काही काळात टीकास्त्र सोडलंय. तर ठाकरे कुटुंबियांना देखील सोमय्या लक्ष्य करताना दिसले आहेत. मग ते 19 बंगल्यांचं प्रकरण असो वा श्रीधर पाटणकरांचं. आता पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं असून त्यांनी यावेळेस अनिल परब यांना लक्ष्य केलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब (Anil Parab) यांच्यावर आज गंभीर आरोप केले आहेत. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
Published on: May 27, 2022 11:18 AM
Latest Videos