Kirit Somaiya | मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

Kirit Somaiya | मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

| Updated on: Sep 20, 2021 | 5:50 PM

आप्पासाहेब नलावडे कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या जावयाचंही नाव घेतलं आहे. त्यानंतर आता किरीट हे मुंबईत परतले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच जंगी स्वागत केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्यावर बेनामी कंपन्यांद्वारे पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. “मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट लिमिटेडचे, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे”, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. या सर्व आरोपानंतर आता किरीट हे पुन्हा मुंबईत परतले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच जंगी स्वागत केलं आहे.