Kirit Somaiya | मुंबई महापालिकेचा 100 कोटींचा घोटाळा उघड करणार : किरीट सोमय्या
सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेनं जागतिक रेकॉर्ड केलाय. येत्या मंगळवारी मुंबई महापालिकेचा 100 कोटीचा घोटाळा उघड करणार. अनिल परब यांचा परिचित व्यक्ती आणि एका अधिकाऱ्याचा 100 कोटीचा कोविड कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. आता सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेनं जागतिक रेकॉर्ड केलाय. येत्या मंगळवारी मुंबई महापालिकेचा 100 कोटीचा घोटाळा उघड करणार. अनिल परब यांचा परिचित व्यक्ती आणि एका अधिकाऱ्याचा 100 कोटीचा कोविड कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
डोंबिवलीत आज संध्याकाळी भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात किरीट सोमय्या, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक मंदार हळबे, मोरेश्वर भोईर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमय्या यांनी शिवसेना खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार टीका केलीय. राऊत यांनी ईडीच्या नोटीसा फाडल्या. मात्र, त्यानंतर वॉरंट आल्यावर पाठच्या दरवाजाने जाऊन 55 लाख परत केले. चोरीचा माल परत केला म्हणून गुन्हा माफ होत नाही. मी लढणार, कोर्टात जाणार, संजय राऊत यांना शिक्षा झाली पाहिजे, असा इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.