Kirit Somaiya निल सोमय्या यांच्यावरती गुन्हा दाखल, नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केल्याचा आरोप

Kirit Somaiya निल सोमय्या यांच्यावरती गुन्हा दाखल, नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केल्याचा आरोप

| Updated on: Apr 07, 2022 | 12:11 PM

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावरती मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी बाप-लेकानी 2013-14 मध्ये एक अभियान चालवलं होतं.

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावरती मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी बाप-लेकानी 2013-14 मध्ये एक अभियान चालवलं होतं. त्यावेळी पिता-पुत्रांनी नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केला होता. बाप-लेकांनी जमा झालेला निधी राज्यपाल यांच्या सचिवाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु तो निधी राज्यपाल सचिवांकडे जमा न करता त्यांनी अपहार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही तक्रार एका माजी सैनिकांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावरती कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आज प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.