हसन मुश्रीफांवर कारवाई, आता ‘या’ नेत्याचा नंबर!; किरीट सोमय्या यांचा इशारा
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे.यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आणखी एका नेत्याला इशारा दिलाय.
kirit Somaiya on Congress Aslam Shaikh : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे.यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सोमय्या यांनी आणखी एका नेत्याला इशारा दिलाय. “हसन मुश्रीफांच्या विरोधात 158 कोटी रूपयांचे पुरावे आम्ही दिले होते. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. फक्त घोटाळे करणं एवढंच ठाकरे सरकारचं काम होतं. आता सगळे घोटाळे बाहेर येतील”, असं किरीट सोमय्या म्हणालेत. “हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली.आता पुढचा नंबर काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांचा आहे. त्यांनी तयार राहावं”, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय.
Latest Videos