कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित शेतकरी किरीट सोमय्यांच्या भेटीला; काय मागण्या? पाहा…
भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित काही शेतकऱ्यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांआधी ईडीची कारवाई झाली. त्याचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झालेत. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संबंधित काही शेतकऱ्यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात शेतकरी आणि सोमय्या यांची भेट झाली. बँके वाचवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन या शेतकऱ्यांनी सोमय्या यांना केलं. त्याबाबतीतीस निवेदनही त्यांनी दिलं. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ समर्थक शेतकरी ही शासकीय विश्रामगृह परिसरात दाखल झालेत.मुश्रीफ यांचे समर्थक शेतकरीदेखील सोमय्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.