Special Report | Kirit Somaiya आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार! -tv9
सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. त्यात महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप नगरसेवकांचा समावेश होता.
पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीचा वाद आता अजून पेटण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे भाजपच चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. त्यात महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप नगरसेवकांचा समावेश होता. या भेटीनंतर बोलताना जगदीश मुळीक म्हणाले की, आम्ही पोलीस कारवाईवर समाधानी नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. त्यांना हिंसा करत महापालिकेत सत्ता आणायची आहे. यापुढे कलम वाढवून नवीन कलमं लावली पाहिजेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसून येत आहे.
Latest Videos