VIDEO : Raigad | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर कोल्हापूर दौरा अडवून दाखवावा – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला. यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलंय. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेले घोटाळे कोल्हापूरमध्ये जाऊन उघडकीस आणणार असल्याची घोषणा करत किरीट सोमय्यांनी कोल्हापूर दौऱ्याचा निर्धार केला आहे.
Latest Videos