किसान लाँग मार्च मधील शेतकऱ्यांची पावसानं दाणादाण, दिवसभर चालून रात्री पावसानं हाल
VIDEO | अचानक पाऊस आल्याने मोर्चेकरांचा पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न, शहापूर जवळील वाशिंद येथे पावसामुळं आंदोलकांचे हाल
शहापूर : नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणाहून निघालेला लाँग मार्च सध्या शहापूर जवळील वाशिंद याठिकाणी येऊन पोहोचला आहे. तेथेच मुक्कामी आहे मात्र रात्री पावसाने अचानक हजेरी लावल्याने मोर्चेकरांची चांगलीच दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. अचानक पाऊस आल्याने मोर्चेकरांनी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डोक्यावर ताडपत्री, उपरणे, प्लास्टिक घेऊन पावसापासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला. या मोर्च्यात दोन ते तीन वेळा अचानक पाऊस आल्याने आंदोलकांची चांगलीच दैना झाली होती. शहापूर येथील वाशिंद येथे मोर्चेकरी पावसापासून बचावासाठी आसरा शोधत आहे. याठिकाणीच त्यांनी सोबत आणलेली काही थोडी शिदोरी खाल्ली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून हा लाँगमार्च काढला आहे. मजल दरमजल करत किसान सभेचं हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने पुढे सरकतंय…पण सरकार कोणता निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.