Special Report | किशोर आवारे यांच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण? हत्येचा कट कुणी अन् कसा रचला?

Special Report | किशोर आवारे यांच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण? हत्येचा कट कुणी अन् कसा रचला?

| Updated on: May 15, 2023 | 8:25 AM

VIDEO | जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा कट कसा आणि कोणी रचला, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : तळेगाव नगरपरिषदेच्या आवारात दोन दिवसांपूर्वी किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. या हत्येच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी अटकही केली. पण ही हत्या का करण्यात आली…१२ मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी तळेगाव नगरपरिषद येथे जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. आवारे हे मुख्य अधिकाऱ्यांना भेटून खाली आलेत तेव्हाच दबा धरून बसलेल्या चार हल्लाखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि शस्त्रांनी वारही केले. ही हत्या झाल्यानंतर काही तासातच पोलिसांकडून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. यातील मुख्य सूत्रधार गौरव खळदे हा देखील अटकेत आहे. किशोर आवारे यांच्या हत्येचा कट कसा आणि कोणी रचला… गौरव खळदे पेशानं सिव्हिल इंजिनिअर आहे. तो स्वतःचा बांधकाम व्यवसायही सांभाळतो. गौरव खळदे आणि आरोपी श्याम निगडकर हे दोघं मित्र यांनी किशोर आवारे यांची हत्या केली. गौरव खळदे हा श्यामला नेहमी आर्थिक मदत करायचा. याच मैत्रीखातर श्याम निगडकर आणि त्याच्या साथीदारांकडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. कधी रचला गेला किशोर आवारे यांचा हत्येचा कट बघा स्पेसल रिपोर्ट…

Published on: May 15, 2023 08:25 AM