राणा दाम्पत्याची नौटंकी सर्वांनाच माहिती, किशोरी पेडणेकरांचा पुन्हा हल्लाबोल
रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद विकोपाला गेला आहे. आता यात ठाकरे गटाने देखील उडी घेतली असून, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद विकोपाला गेला आहे. आता यात ठाकरे गटाने देखील उडी घेतली असून, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे. राजकारणात सी ग्रेडमधून आलेले ए ग्रेडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. राणा दाम्पत्याची नौटंकी सर्वांनाच माहिती आहे, असा घणाघात पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर केला आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे, बच्चू कडू यांनी स्वत:च्या हिमतीवर पक्ष उभा केला आहे. त्यांना अनेक आमदारांचा पाठिंबा आहे. अशा व्यक्तीवर जर आरोप होत असतील तर त्यांना त्याचा त्रास होणारच असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
Published on: Oct 27, 2022 03:02 PM