किशोरी पेडणेकर यांनी घेतली सजंय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीजेनिमित्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
मुंबई : आज भाऊबीज आहे. सर्वत्र भाऊबीजेचा उत्साह दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीजेनिमित्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सध्या संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात कारागृहात आहेत. किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री आणि भाऊ सुनील राऊत हे उपस्थित होते. दरम्यान रवी राणा माझा कधीही भाऊ नव्हता. किरीट सोमय्या मात्र माझा भाऊ आहे. अजूनही आहे. सोमय्या हे त्यांच्या पक्षाच्या अंजेंड्याप्रमाणे त्यांचं काम चोख बजावतात अशी प्रतिक्रिया देखील किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
Published on: Oct 26, 2022 02:46 PM