किशोरी पेडणेकर वैतागल्या, म्हणाल्या, हा बदनामीचा कट, लवकरच ‘या’ 2 नेत्यांना भेटणार

माझं निवेदन घेऊन जाणार आहे. ते मूळ शिवसैनिक आहेत.. त्यांना भेटणं हा माझा हक्क आहे, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय.

किशोरी पेडणेकर वैतागल्या, म्हणाल्या, हा बदनामीचा कट, लवकरच 'या' 2 नेत्यांना भेटणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 3:59 PM

मुंबईः मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) नेहमीच विरोधकांना चोख उत्तर देतात. पण आता त्याच अडचणीत सापडल्या आहेत. गोमाता नगर एसआरए प्रकल्पातील (SRA Project) गाळ्यांबाबत किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) किशोरी पेडणेकर यांच्यावर सहा गाळे हडपल्याचे आरोप केले आहेत. याच प्रकल्पात फ्लॅट देतो असे सांगून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन तीनजणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातही आरोपींच्या जबाबात किशोरी पेडणेकरांचे नाव समोर आले आहे. मात्र, जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याकरता खोटे आरोप केले जात असल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे.

मंगळवारी किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनला हजेरी लावली. पोलिसांच्या प्रश्नांना किशोरी पेडणेकर यांनी उत्तरं दिली. ही चौकशी तब्बल अडीच तास चालली. मला ज्या प्रश्नांची उत्तरं येत होती, ती मी दिली. मी पोलिसांना सहकार्य करणार नाही, अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. मी तसं करणार नाही. कायद्यानुसार, उत्तरं देईन, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

या प्रकरणी त्या लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ मी मुख्यमंत्र्यांना निरोप दिला आहे. माझं निवेदन घेऊन जाणार आहे. ते मूळ शिवसैनिक आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना भेटणार आहे. तो माझा हक्क आहे.

पाहा किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

दरम्यान, भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र गोमाता नगर मध्ये जाऊन पाहणी केली … गोमाता नगर मध्ये एक रूम चुन्नीलाल पटेलच्या नावे आहे आणि चंद्रकांत चव्हाण आधीपासून इथे राहात आहे. सध्या ही त्यांचे कुटूंब पण इथेच राहाते आहे. याचा अर्थ किशोरी पेडणेकर याचे चंद्रकांत चव्हाण यांचे आर्थिक संबंध आहे. माझ्याकडे त्यांच्या आणखी काही माहिती आहे. ती मी पोलिस आणि एसआरएला दिली आहे. त्यामुळे लवकरच ते घोटाळे पण बाहेर येतील. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे

तर दुसरीकडे शिंदे गट प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांचा समाचार घेतला आहे गद्दार खोके बोके हे शब्द तुम्हीच वापरले होतात ना ताई…आता मूळ शिवसैनिक हे शब्द आठवायला लागलेत… आता तुम्हाला नाती आठवत आहेत.. आता म्हणता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार म्हणता.. कॅग चौकशी झाल्यावर कोणाकोणाला भेटणार हे ठरवून ठेवा, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले पाहा-

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.