दिवाळीत काही ठिकाणी पैशांचा पाऊस, किशोरी पेडणेकरांचा इशारा कुणीकडे?
बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली.
मुंबईः राज्यभरात दिवाळीनिमित्त (Diwali) उत्साही वातावरण असताना राजकीय नेतेही यावरून तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीयेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) आजच्या वरळीतील (Worli) भाजपच्या कार्यक्रमाला टार्गेट केलं. आज काही ठिकाणी दिवाळीचा बराच झगमगाट आहे. काही ठिकाणी तर पैशांचा पाऊस पडतोय, असा टोमणा किशोरी पेडणेकरांनी लगावलाय.
भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील जांभोरी मैदानावर दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलाय. यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ वरळीत अनेक ठिकाणी दिवाळी पहाट सुरु आहे.
काही ठिकाणी झगमगती दिवाळी पहाट आहे. पैशांचा पाऊस पडतोय. वेगवेगळ्या माध्यमांतून हे सुरु आहे. पण विचार काय तर काहीच नाही….
पाहा किशोरी पेडणेकर काय म्हण्याल्या?
बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही….
हा केविलवाणा प्रयत्न आहे, असं म्हणायला हरकत नाही. शिंदे गटातील वाचाळवीरांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील शिवसेनेवर टीका केली. मागील अडीच वर्षात ज्यांनी काहीच केलं नाही, ते आता टीका करत आहेत. शेतकऱ्यांना आम्ही केलेली मदत विरोधकाना खुपतेय, असा टोला त्यांनी लगावला आहे.
ज्यांनी अडीच वर्षात कुणाचे अश्रू पुसले नाहीत. जे अडीच वर्षांतून घरातून बाहेर पडले नाहीत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
शिवसेनेवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, ‘ दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती. नवीन सरकारने साऱ्या मर्यादा बाजूला केल्या सण साजरे करायला सुरुवात केली आहे.
सध्या दिवाळी आहे. प्रकाशोत्सव आहे. आम्ही अनेक ठिकाणी दिवाळीचे कार्यक्रम आयोजित करत आहोत. आज रंगशारदा मध्ये सुद्धा सुरमयी सकाळ झाली, अशी माहिती शेलार यांनी दिली.