Kishori Pednekar | बाळासाहेबांच्या टॉनिकला कुठेच फूट पट्टी लागत नाही – किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडत शिवसैनिकांच्या समर्थनात बोलताना अगदी शिवसेना स्टाईल वक्तव्य केलं आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राणेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडलं. या सर्व कृतीनंतर बऱ्याच चर्चांना उधान आलं होतं.
दरम्यान यावर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडत शिवसैनिकांच्या समर्थनात बोलल्या आहेत. त्यांनी अगदी शिवसेना स्टाईल वक्तव्य केलं आहे. ही कृती करणारे शिवसैनिक हे बाळासाहेंबाचे ते अंगार आहेत. ते बाळासाहेंबाचे टॉनिक आहेत, त्यांना कुठेच फुटपट्टी लागत नाही. असंही त्या म्हणाल्या.
Latest Videos