Special Report | किशोरी पेडणेकर VS आशिष शेलार वाद, विधानसभेत उमटले पडसाद
भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या वादाचे पडसाद विधानसभेतही दिसून आले
मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या वादाचे पडसाद विधानसभेतही दिसून आले. वरळीतल्या सिलिंडर स्फोट(Worli Cylinder Blast)प्रकरणी टीका करताना शेलारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devedndras Fadnavis) यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Latest Videos