Special Report | Narayan Rane यांच्या अडचणी वाढणार? -tv9

Special Report | Narayan Rane यांच्या अडचणी वाढणार? -tv9

| Updated on: Feb 21, 2022 | 10:03 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार अर्ज सादर केला आहे. राज्य महिला आयोगाकडूनही या अर्जाची दखल घेण्यात आलीय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची जागा आता शिवराळ भाषा आणि चिखलफेकीनं घेतली आहे. अशावेळी अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुनही गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार अर्ज सादर केला आहे. राज्य महिला आयोगाकडूनही या अर्जाची दखल घेण्यात आलीय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले आहेत.

सुशांतसिंग राजपूतची व्यवस्थापक राहिलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नाही. तसंच त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याला तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.