Dombivli रेल्वे स्टेशनवरील कपलचा ‘किसिंग सीन’ व्हायरल

| Updated on: Mar 12, 2022 | 9:23 AM

ल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीत प्लॅटफॉर्मवरच प्रेमी युगुल रोमान्स (Couple Kissing) करत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला होता.

डोंबिवली : रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीत प्लॅटफॉर्मवरच प्रेमी युगुल रोमान्स (Couple Kissing) करत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला होता. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली रेल्वे स्थानकावर (Dombivli) हा प्रकार घडल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणी डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. तरुण-तरुणी एकमेकांच्या मिठीत शिरुन किसिंग करत असल्याचं पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे काही प्रवाशांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

काय आहे हा व्हिडीओ?

प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहून तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारत आहेत आणि चुंबन घेत आहेत, असं व्हिडीओमध्ये दिसतं. 21 सेकंदांच्या या व्हिडीओत स्टेशनवरील अनाऊन्समेंटही ऐकू येते. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेली लोकल 11 वाजून 4 मिनिटांची.. इतक्या उद्घोषणेनंतर व्हिडीओ थांबतो.