Sharad Pawar Birthday | नागपुरातल्या 1995 च्या भाषणात शरद पवार RSS बद्दल काय म्हणाले?

| Updated on: Dec 11, 2021 | 6:21 PM

नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक, राजकीय आणि देशाचा केंद्रबिंदू या नात्याने भौगोलिकदृष्ट्याही मोठे महत्त्वाचं स्थान आहे. हिंदुत्वाचा विचार ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोपासला आणि वाढवला त्या संघाचे मुख्यालयही येथेच आहे. अर्ध चड्डीवाल्यांनी धर्म आणि जातीयतेचे विष माणसामाणसात पेरून या देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणली आहे.

मुंबई: पवारांनी नागपूर येथे 18 एप्रिल 1996 रोजी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी हे भाषण केलं होतं. काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या प्रचारसभेतील हे भाषण आहे. या भाषणात त्यांनी गोळवलकर गुरुजी, संघ आणि सावरकरांबद्दलची आपली मते व्यक्त केली आहेत. नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक, राजकीय आणि देशाचा केंद्रबिंदू या नात्याने भौगोलिकदृष्ट्याही मोठे महत्त्वाचं स्थान आहे. हिंदुत्वाचा विचार ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोपासला आणि वाढवला त्या संघाचे मुख्यालयही येथेच आहे. अर्ध चड्डीवाल्यांनी धर्म आणि जातीयतेचे विष माणसामाणसात पेरून या देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणली आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी याच नागपूर शहरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1930 पर्यंत ते सरसंघचालक म्हणून राहिले आणि दुसऱ्यांदा 1931 मध्ये ते सरसंघचालक म्हणून निवडून गेले. ते 1940 पर्यंत राहिले. म्हणजे ते जवळपास 15 वर्ष डॉ. हेडगेवार हे संघाचे प्रमुख होते.