कोकणवासियांसाठी मोठी बातमी, तुळशी घाटात कोसळली दरड, ‘या’ मार्गावरील वाहतूक ठप्प
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने जिल्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून आजही अशीच घटना घडली. मंडणगड बाणकोट या मार्गावर तुळशी घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीनव विस्कळीत झाले आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने जिल्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून आजही अशीच घटना घडली. मंडणगड बाणकोट या मार्गावर तुळशी घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे. मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आले होते. याच कारणाने सतत मंडणगड बाणकोट या मार्गावर डोंगराची दरड कोसळत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे तुम्ही या मार्गावरून जात असाल तर परिस्थिती पाहून प्रवास करा अन्यथा पर्यायी मार्ग निवडा.
Published on: Jul 10, 2024 01:13 PM
Latest Videos