पुरातत्व विभागाचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल; झीज रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?
Kolhapur Ambabai Murti Deterioration : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचं बोललं जात आहे. मूर्तीचे ओठ, कान आणि पायाची तसंच हाताची बोटं जीर्ण होत असल्याचं दावा करण्यात येतोय. त्यामुळे पुरातत्व विभागाचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल झालेत.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचं बोललं जात आहे. मूर्तीचे ओठ, कान आणि पायाची तसंच हाताची बोटं जीर्ण होत असल्याचं दावा करण्यात येतोय. ही झीज झाल्यामुळे मूर्तीच्या चेहऱ्यावरील हावभावही बदलल्याचं दिसत असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे पुरातत्व विभागाचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल झालेत. दोन अधिकाऱ्यांकडून अंबाबाई मूर्तीची पाहणी केली जात आहे. झीज झाल्याची चर्चा झाल्याची माहिती समोर येताच पुरातत्त्व विभागाला जाग आली अन् पुरातत्व विभागाचे अधिकारी तातडीने मंदिरात दाखल झालेत.
Published on: Feb 28, 2023 09:54 AM