Kolhapur | कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये लघु बंधारा फुटला, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान
बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याच ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय...कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघू पाटबंधारे प्रकल्प असून पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय... तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेलीय, दरम्यान या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटल्याची माहीती मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशीरा दिलीय. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याच ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय…कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघू पाटबंधारे प्रकल्प असून पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय… तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेलीय, दरम्यान या प्रकल्पातील पाण्यामुळे आता वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून वेदगंगा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रात्री या बंधार्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं
Latest Videos