देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार? चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून शिवाजीराव पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला होता. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली, त्यानंतर आता कोल्हापुरात शरद पवार भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी हा मोठा धक्का असणार आहे.
Published on: Sep 30, 2024 01:34 PM
Latest Videos