VIDEO : Chandrakant Patil | टाहो मोर्चादरम्यान चंद्रकांत पाटील पुरग्रस्तांबाबत काय म्हणाले ?

VIDEO : Chandrakant Patil | टाहो मोर्चादरम्यान चंद्रकांत पाटील पुरग्रस्तांबाबत काय म्हणाले ?

| Updated on: Jun 01, 2022 | 2:37 PM

आज कोल्हापूरमध्ये टाहो मोर्चा काढण्यात आला. या टाहो मोर्चामध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. अद्यापही कोल्हापुरमधील पूरस्थितीचे कोणतेही नियोजन हे प्रशासनाकडून करण्यात आले नाही.  मागील वर्षाचे पैसे अजून पूरग्रस्तांना मिळाले नसल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला. 

आज कोल्हापूरमध्ये टाहो मोर्चा काढण्यात आला. या टाहो मोर्चामध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. अद्यापही कोल्हापुरमधील पूरस्थितीचे कोणतेही नियोजन हे प्रशासनाकडून करण्यात आले नाही. मागील वर्षाचे पैसे अजून पूरग्रस्तांना मिळाले नसल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला. आम्ही आता उद्यापासून भाजपाच्या कार्यालयामध्येच काउंटर सुरू करणार आहोत. मागील वर्षी ज्यांना मदत जाहीर झाली पण मिळाली नाही, त्यांनी आपली नावे नोंदवावीत. आम्ही त्यांची यादी करून त्याचा पाठपुरावा करणार. यावर्षी पूर येवू नये, मात्र आल्यास तयारी काय? असेही पाटील म्हणाले.

 

Published on: Jun 01, 2022 02:37 PM