कोल्हापूरची चिंता वाढली, डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्यानं नवं आव्हान
कोल्हापूरकरांसाठी चिंताजनक बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 नमुने डेल्टा प्लसचे असल्याचं आढळून आल्यानं कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे.
कोल्हापूरकरांसाठी चिंताजनक बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 नमुने डेल्टा प्लसचे असल्याचं आढळून आल्यानं कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे. कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्यात 4 रुग्णांची नोंद झालीय. कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वपदावर येत असताना डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्यानं खळबळ माजली आहे. डेल्टा प्लसच्या रुग्णांमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर नव आव्हान उभं राहिलं आहे. कोरोना आणि महापुराला तोंड देणाऱ्या कोल्हापूरसमोर या निमित्तानं नवं संकट उभं राहिलंय.
Latest Videos