Kolhapur | कोल्हापुरात गोकुळची सभा आता ऑनलाईन, शौमिका महाडिकांचा कडाडून विरोध

Kolhapur | कोल्हापुरात गोकुळची सभा आता ऑनलाईन, शौमिका महाडिकांचा कडाडून विरोध

| Updated on: Sep 24, 2021 | 8:21 AM

चार महिन्यात नफ्यात आणल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे, तर सत्ताधाऱ्यांनी तोटा वाढविल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एक ना अनेक आरोप प्रत्यारोपावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. सत्तांतरानंतरची ही पहिलीच वार्षिक सभा होत आहे. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील असणार आहेत. सत्तांतरानंतरच्या पहिल्याच ऑनलाईन सभेत राडा होण्याची शक्यता आहे. चार महिन्यात नफ्यात आणल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे, तर सत्ताधाऱ्यांनी तोटा वाढविल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एक ना अनेक आरोप प्रत्यारोपावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन सभेत सत्ताधारी गटाचा 328 कोटींच्या जागा खरेदीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा विरोध आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या खरेदीचा प्रस्ताव ऑनलाइन सभेत का, असा सवाल यानिमित्ताने शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे.