कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची चाकं पुन्हा थांबणार! काय आहे कारण?
नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 28 जानेवारीपर्यंत रद्द
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची चाकं पुन्हा थांबणार असून आजपासून 28 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-गोंदिया या जिल्ह्यातून धावणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात मात्र आजपासून तीन दिवस ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Published on: Jan 26, 2023 08:06 AM
Latest Videos