कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

| Updated on: Jul 22, 2021 | 10:22 AM

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे.

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीचे पाणी पातळी आता 35 फूट 7 इंचापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पंचगंगा नदीची पातळी 39.4 धोका पातळी 43 फूट समजली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच कुंभी नदीचे पाणी मांडुकली या ठिकाणी आल्याने कोल्हापूर गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील 39 बंधारे देखील आता पाण्याखाली गेले आहेत.