अख्ख्या कुरुंदवाडवाले साले #@*… मुख्याधिकाऱ्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ऑडिओ व्हायरल, नागरिकांबाबत अपशब्द अन्…
खासदारांना दोन लाख रूपये द्यावे लागणार असं वक्तव्य मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटल्याचे ऐकायला मिळत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपप्रकरणी कोल्हापुरच्या कुरूंदवाडमधील नागरिकांनी आंदोलन केले आहे.
कोल्हापुरच्या कुरूंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये नागरिकांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप कुरूंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्यावर करण्यात आला आहे. खासदारांना दोन लाख रूपये द्यावे लागणार असं वक्तव्य मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटल्याचे ऐकायला मिळत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपप्रकरणी कोल्हापुरच्या कुरूंदवाडमधील नागरिकांनी आंदोलन केले आहे. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्याधिकारी आशिष चौहान यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. दरम्यान, कोल्हापुरच्या कुरूंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आशिष चौहान आणि एका महिला अधिकारी यांच्यातील हे ऑडिओ क्लिपमध्ये आशिष चौहान यांनी कुरूंदवाडच्या नागरिकांबाबत अपशब्द आणि गैरव्यवहाराबाबतही उल्लेख केला आहे.