कोल्हापूर मार्केट यार्डातील हमालांना बाजार समितीत बंदी, काय आहे कारण?

कोल्हापूर मार्केट यार्डातील हमालांना बाजार समितीत बंदी, काय आहे कारण?

| Updated on: Feb 08, 2023 | 10:45 AM

कोल्हापूर मार्केट यार्डात गुळ हमालांसाठी १४४ कलम, हमालांच्या बंदीमुळे हमाल आणि प्रशासनामध्ये संघर्षाची चिन्ह

कोल्हापूर : कोल्हापूर मार्केट यार्डातील हमालांना बाजार समितीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर गुळ हमालांसाठी १४४ लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हे आदेश काढण्यात आले आहे. हमालांकडून दरवाढीबाबत वारंवार गुळ सौदे बंद पाडले जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना हा निर्णय घेणं भाग पडलं आहे. तर बाजार समितीमध्ये नवीन हमालांची नेमणूक होणार असल्याचेही सांगितले जात आहे. कोल्हापूर मार्केट यार्डातील हमाल काल दुपारी आपल्या हमालीसाठी आक्रमक झाले होते. त्यानंतर त्यांनी काम बंद केले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही झाली पण हमाल त्यांच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. वारंवार गुळ सौदे बंद पाडले जात असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हमालांना बाजार समितीत येण्यास बंदी घातली आहे.

Published on: Feb 08, 2023 10:45 AM