Kolhapur News : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
Kolhapur Bajrang Dal Protest : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता पेटला असून कोल्हापूर आणि पुण्यात विहंप आणि बजरंग दलाकडून ही कबर काढून टाकण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलेलं आहे.
राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेब याची कबर काढून टाकण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आज कोल्हापुरात याच पार्श्वभूमीवर बजरंग दल आणि विहंपकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी औरंगजेब याची प्रतीकात्मक कबर तोडून आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिस आणि आंदोलकांत धरपडक देखील झाली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर दुसरीकडे पुण्यात देखील विहंपकडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, औरंगजेब याच्या कबरीच्या ठिकाणी संभाजीनगरच्या खुलताबाद येथे पुरातत्व विभागाचे अधिकारी दाखल झालेले आहेत. या संपूर्ण परिसरात अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे.